नांदेड, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद शहरातील विविध रस्त्यांची आणि उद्यानाची पाहणी केली. विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात ही पाहणी करण्यात आली आहे.
धर्माबाद शहरातील विविध नागरिकांच्या घरी सदिच्छा भेटी देतानाच अनेक गल्ल्यांमधील रस्त्यांची, नाली बांधकामांची व उद्यानाची पाहणी केली.
भाजप-महायुती सरकारच्या माध्यमातून धर्माबाद शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेच, परंतु शहराच्या विकासात भर घालणारे व शहराला वैभव प्राप्त करुन देणारे रस्ते-सोयीसुविधा देण्याचा मानस आहे, असे आमदार राजेश पवार यांनी सांगितले आहे.
यामुळेच धर्माबाद शहरातील रस्ते, नाल्यांचे बांधकाम, उद्याने आदींची पाहणी करुन कार्यकर्त्यांसोबत याविषयी चर्चा देखील केली.
यावेळी धर्माबाद शहरातील नागरिक, भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis