नांदेड, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अधिकाधिक बहुमत मिळाले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्यातील भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे
आज नांदेड येथे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत असताना नागरिकांना अधिकाधिक योजना समजून सांगाव्यात असेही ते म्हणाले
नांदेड जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष निश्चितपणे लढवणार असून यामध्ये आपल्याला विजय अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्षाच्या नांदेड जिल्हा केंद्रीय कार्यालयाचे आज उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा.अजित गोपछडे विधानसभेतील सहकारी सर्व सदस्य भागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis