छत्रपती संभाजीनगर, 22 ऑक्टोबर (हिं.स.) - भारतीय जनता पक्षाचे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गंगापूर स्थानिक स्वराज्य मतदार संघात भाजप संघटनात वाढ करणार असल्याचे आ. बंब यांनी सांगितले.
भाजपाची निवडणूक पूर्वतयारी बैठक उत्साहात पार!
गंगापूर – खुलताबाद (रत्नपूर) विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यमित्र, बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन संघटन मजबूत करण्यावर, प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पक्षाच्या धोरणांचा संदेश पोहोचवण्यावर आणि मतदारांशी सशक्त संवाद साधण्यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते व कार्यमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis