बीड, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते मौजे पालवन येथील दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी आणि ग्रामीण भागात व्यवसायिक प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचे पाऊल आहे. अशा शब्दात मस्के यांनी कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यास निश्चित यश मिळते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आज बीड तालुक्यातील मौजे पालवन येथील कामांच्या भूमिपूजनाचा शुभ कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. या मंगल प्रसंगी सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि शुभेच्छूक उपस्थित होते. दीपावली पाडव्याच्या शुभदिनी, नवीन कार्याचा शुभारंभ होत असताना गावाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि सर्वांच्या उन्नतीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis