नाशिक : एनएमआरडीएच्या विरोधात नागरिकांचे उपोषण सुरू
नाशिक, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिक त्रंबक रस्त्यावरील जागा ताब्यात घेण्याच्या प्रकरणी आता नाशिक विकास प्राधिकरणा विरोधात या पंचक्रोशीतील नागरिकांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. नाशिक त्रंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पा
नाशिक : एनएमआरडीएच्या विरोधात नागरिकांचे उपोषण सुरू


नाशिक, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिक त्रंबक रस्त्यावरील जागा ताब्यात घेण्याच्या प्रकरणी आता नाशिक विकास प्राधिकरणा विरोधात या पंचक्रोशीतील नागरिकांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे.

नाशिक त्रंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ती राज्य शासनाने नाशिक त्रंबकेश्वर हा महामार्ग सहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी म्हणून नाशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाला चालना देण्यासाठी भूसंपादनाचे कार्य सुरू केले आहे मात्र नागरिकांना त्याच्या मोबदला न देता नागरिकांचे वर्षानुवर्षाचे असलेली जागा आणि बांधकामे ही अतिक्रमणित ठरविण्यात आली आहे त्यामुळे नाशिक त्रंबक महामार्गावरील असलेल्या सर्वच गावातील नागरिकांनी या मोहिमेला विरोध सुरू केला आहे सहा दिवसापूर्वी ज्यावेळी हे सुरू झाले होते त्यावेळी मोठ्या प्रमाणावर विरोध झाला तर दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळी दिवाळी या पंचक्रोशीतील नागरिकांनी साजरी केली होती.

त्यानंतर आज बुधवारी या पंचक्रोशीतील नागरिकांनी एकत्र येऊन महिरवणी येथील भागात मध्ये सकाळी उपोषण सुरू केले आहे नाशिक विकास प्राधिकरणाने ही मोहीम तातडीने थांबवावी अशी मागणी असून चुकीच्या पद्धतीप्रमाणे या भागातील पंचक्रोशी मध्ये असलेले बांधकाम तसेच मोकळ्या जमिनी या अतिक्रमण ठरवून खाली करण्याचे काम नाशिक विकास प्राधिकरण करत आहे ते चुकीचे असल्याचे मत येथील आंदोलन करते व्यक्त करीत आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande