अचलपूर तालुक्यात मतदार यादीत गोंधळ, एकाच व्यक्तीची तीन नावे, नागरिकांत संताप
अमरावती, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील धोतरखेडा येथील यादी भाग क्रमांक २७३ : १ - हणवत खेडा, निर्वाचन गण २९ मध्ये मतदार यादीच्या मूळ प्रारूपात गंभीर घोळ समोर आला आहे. एका व्यक्तीची तीन वेगवेगळी नावे मतदार यादीत आढळून आ
अचलपूर तालुक्यात मतदार यादीत गोंधळ – एकाच व्यक्तीची तीन नावे, नागरिकांत संताप


अमरावती, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील धोतरखेडा येथील यादी भाग क्रमांक २७३ : १ - हणवत खेडा, निर्वाचन गण २९ मध्ये मतदार यादीच्या मूळ प्रारूपात गंभीर घोळ समोर आला आहे. एका व्यक्तीची तीन वेगवेगळी नावे मतदार यादीत आढळून आल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

सदर प्रकरणात निवडणूक आयोगाच्या यंत्रणेकडून प्राथमिक तपासणीदरम्यान ही चूक उघडकीस आली. अशा प्रकारे एकाच व्यक्तीची नावे तीन वेळा यादीत समाविष्ट होणे ही निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून, मतदार याद्यांमध्ये अशा चुका होणे अत्यंत गंभीर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत सुधारित यादी प्रसिद्ध करावी आणि दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.यासंदर्भात निवडणूक विभागाने योग्य ती दखल घेऊन, पुन्हा एकदा छाननी करून चुकीच्या नोंदी तातडीने सुधाराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande