‘डीपीसी’तून ९०० कोटींच्या कामांना मान्यता, सहाशे कोटींच्या कामांचे कार्यादेश
पुणे, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजे डीपीसी मंजूर आराखड्यापैकी ९०० कोटींच्या कामांना मान्यता मिळाली असून, त्यापैकी ६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीचे कार्यादेश पुणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्
‘डीपीसी’तून ९०० कोटींच्या कामांना मान्यता, सहाशे कोटींच्या कामांचे कार्यादेश


पुणे, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजे डीपीसी मंजूर आराखड्यापैकी ९०० कोटींच्या कामांना मान्यता मिळाली असून, त्यापैकी ६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीचे कार्यादेश पुणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्याच्या विविध भागांत माॅडेल स्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे येत्या काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून १ हजार ४०० कोटींचा वार्षिक आराखडा करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यामध्ये जिल्ह्यातील ३०३ आदर्श शाळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्याशिवाय शिक्षण, आरोग्यासाठी प्रत्येकी १०० कोटी, बंधारे तलाव दुरुस्तीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग होणार आहेत.याशिवाय, जिल्हा रुग्णालयासाठी यापूर्वीच तीन कोटी रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. नागरी सुविधा, जन सुविधांतील कामांमध्ये रस्ते, गटार, ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी बांधकाम यांसारख्या कामांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande