नाशिकरोड कारागृहात महिला बंदींसाठी दिवाळी स्नेहमहोत्सव
नाशिक, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिकरोड कारागृहातील महिला कैद्यांच्या मुलांसाठी रचनाज फन क्लब फाउंडेशन, मुंबई आणि विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने, दिवाळीनिमित्त १३३ महिला बंद्यांना उपयोगी भेटवस्तू देण्
नाशिकरोड कारागृहात महिला बंदींसाठी दिवाळी स्नेहमहोत्सव


नाशिक, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिकरोड कारागृहातील महिला कैद्यांच्या मुलांसाठी रचनाज फन क्लब फाउंडेशन, मुंबई आणि विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने, दिवाळीनिमित्त १३३ महिला बंद्यांना उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करण्यात आला. कारागृहात आपल्या मातेसोबत राहणाऱ्या लहान मुलांना नवीन कपडे देऊन त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद उमटला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने कारागृहातील सवर्च उपस्थित भारावून गेले होते. तर बंदी महिलांच्या मुलांमध्येही आनंद व्यक्त होत होता. या दोन्ही संस्थांकडून नन्हे कदम ही बालवाडी चालवली जाते. उपक्रमांतर्गत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याचबरोबर महिला बंद्यांसाठीही विचारशक्ती वाढविणे, कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व घडविणे या उद्देशाने विविध उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी महिलांना प्रेरणादायी व उपयुक्त पुस्तके देण्यात येतात. दिवाळी निमित्ताने झालेल्या या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अधीक्षक अरुणा मुगुटराव यांनी भूषविले, विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक ऋचिता ठाकूर उपस्थित होत्या. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला बंदी विभागाच्या प्रभारी देविका बेडवाल तसेच इतर कारागृहातील गार्डचे विशेष सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande