छ. संभाजीनगर : दीपावली पाडवा निमित्त भाजप शिवसेना काँग्रेस नेते एकत्र
छत्रपती संभाजीनगर, 22 ऑक्टोबर, (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर येथे जुना मोंढा येथे व्यापारी असोसिएशन यांच्या वतिने दरवर्षी प्रमाणे परंपरा जपत आज दीपावली पाडवा निमित्त स्नेहमीलन कार्यक्रम निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.याप्रसंगी छत्रपती संभ
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 ऑक्टोबर, (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर येथे जुना मोंढा येथे व्यापारी असोसिएशन यांच्या वतिने दरवर्षी प्रमाणे परंपरा जपत आज दीपावली पाडवा निमित्त स्नेहमीलन कार्यक्रम निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भारतीय जनता पक्षाचे संभाजीनगर येथील खासदार डॉक्टर भागवत कराड काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.दीपावलीच्या निमित्ताने हे सर्व नेते एकत्र आलेले दिसले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande