दिवाळीच्या मुहूर्तावर एकनाथ शिंदे यांनी साधला अण्णा हजारे यांच्याशी संवाद
अहिल्यानगर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अण्णांनी लवकरच एकदा राळेगण
दिवाळीच्या मुहूर्तावर एकनाथ शिंदे यांनी साधला अण्णा हजारे यांच्याशी संवाद


अहिल्यानगर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अण्णांनी लवकरच एकदा राळेगणसिद्धीला भेट देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन लवकरच राळेगणसिद्धीला येऊन आपल्याला समक्ष भेटू असे सांगितले.

दिवाळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि अण्णा हजारे यांचे व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे करून दिले. यावेळी या दोघांनी एकमेकांशी संवाद साधला.

यावेळी अण्णा आणि राळेगणसिद्धीमधील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना एकदा राळेगणसिद्धी गावाला भेट देण्याची आग्रहाची विनंती केली. गावकऱ्यांच्या विनंतीला मान देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच राळेगणसिद्धीला भेट देण्याचा शब्द दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande