छत्रपती संभाजीनगर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। गंगापूर - खुलताबाद (रत्नपूर) विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी या सर्वांचे स्वागत केले.
या कार्यक्रमात परिसरातील अनेक नवयुवक, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवत अधिकृतपणे पक्ष प्रवेश केला. राष्ट्रहित, विकास आणि जनकल्याणाच्या धोरणांवर ठाम विश्वास ठेवून या नव्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विचारधारेचा स्वीकार केला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यमित्र, बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख तसेच विविध विभागांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis