संगणक कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा - राज्यपाल बागडे
छत्रपती संभाजीनगर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। संगणक कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे एका कार
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।

संगणक कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

फुलंब्री येथील गुरुकुल विद्यालय, शांती प्रतिष्ठान, किनगाव यांच्या पुढाकारातून साकार झालेल्या अत्याधुनिक संगणक कक्षाचे भव्य उद्घाटन राजस्थानचे महामहीम राज्यपाल श्री.हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते संपन्न झाले.

संगणक कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा मिळेल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आहे. या शब्दात राज्यपाल बागडे यांनी कौतुक केले

याप्रसंगी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर श्री.अतुल चव्हाण, श्री.देवजीभाई पटेल, श्री.निवृत्ती गावंडे, श्री.सर्जेराव ठोंबरे, श्री.दामू अण्णा नवपुते मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande