छत्रपती संभाजीनगर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या उपस्थितीत “दिवाळी पहाट” कार्यक्रम संपन्न झाला. त्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांना नानांनी दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या !
याप्रसंगी आमदार सौ अनुराधाताई चव्हाण, मुख्य अभियंता श्री अतुल चव्हाण, सभापती श्री राधाकिसन बापू पठाडे, मा.उपमहापौर श्री विजय औताडे, महिला जिल्हाध्यक्ष श्री ऐश्वर्या ताई गाडेकर , मा सभापती श्री सर्जेराव मेटे उपस्थित होते
नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद तसेच गायक व कलाकारांचे सादरीकरण यामुळे ही दिवाळी अविस्मरणीय ठरली आनंदाच्या क्षणांना घेऊन आलेली ही पहाट आपल्या सर्वांच्या जीवनात सुख आणि समृद्धी देत राहो, हीच प्रार्थना असे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis