कापूस सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा; सिरसाळा येथे किसान सभेचे आंदोलन
बीड, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। बळीप्रतिपदे दिनी सोयाबीन कापूस शासकीय खरेदी केंद्र सुरू करा,सरसकट शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, अशा विविध मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातील किसान सभेने शिरसाळा तालुका परळी येथे मोठे आंदोलन केले. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी म
कापूस सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा; सिरसाळा येथे किसान सभेचे आंदोलन


बीड, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। बळीप्रतिपदे दिनी सोयाबीन कापूस शासकीय खरेदी केंद्र सुरू करा,सरसकट शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा,

अशा विविध मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातील किसान सभेने शिरसाळा तालुका परळी येथे मोठे आंदोलन केले. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस शासकीय खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी सुरू झाली पाहिजे अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

अतिवृष्टी अनुदानाची घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, उद्योगपती धार्जीने सक्तीचे जमीन अधिग्रहण बंद करा, शेतमजुरांना अतिवृष्टीच्या काळातील श्रम नुकसान भरपाई द्या. या मागण्यांसाठी किसान सभेने सिरसाळा ता. परळी जि. बीड येथे आंदोलन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande