बीड, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। आष्टी शहरातील खडकत रोडवर चटाले बंधू यांच्या भैरवनाथ कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून योग्य पिकांवर योग्य खत व औषधांचा पुरवठा व्हावा, फवारणी कशी करावी याचे मार्गदर्शन मिळावे, तसेच माफक दरात ही औषधे उपलब्ध व्हावीत, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. असे आमदार धस म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पिकाला कुठल्याही प्रकारचा भेसळीचा परिणाम होऊ नये याची काळजी दुकानदाराने घ्यावी. असे आवाहन धस यांनी केले.
आपल्या खत व औषधांचा शेतकऱ्यांना खरा फायदा मिळावा, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे. या वेळी त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis