नांदेड, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा कार्यालय येथे आगामी नांदेड महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा कार्यालय येथे आगामी नांदेड महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण मेळावा संपन्न झाला. या बैठकीत निवडणुकीच्या रणनिती, संघटनात्मक बळकटीकरण, आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजयजी कौडगे, आमदार डॉ. तुषारजी राठोड, आमदार भीमरावजी केराम, आमदार राजेशजी पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार श्रीजया चव्हाण, माजी आमदार डी.पी. सावंत, महानगर अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात आगामी निवडणुकांसाठी बूथस्तरावर संघटन मजबूत करणे, मतदारसंघनिहाय नियोजन आखणे आणि स्थानिक प्रश्नांवर केंद्रित प्रचार मोहीम राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीने पक्षाच्या आगामी निवडणुकीच्या तयारीस नवी गती मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis