स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा - दत्तात्रय भरणे
सोलापूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। आपला पक्ष शाहू, फुले व आंबेकरांच्या विचार धारेवर चालणारा आहे. चुकीचे वक्तव्य करतो, त्यास परखडपणे उत्तर देणारा केवळ कणखर नेता अजित पवार हेच आहेत.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा - दत्तात्रय भरणे


सोलापूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।

आपला पक्ष शाहू, फुले व आंबेकरांच्या विचार धारेवर चालणारा आहे. चुकीचे वक्तव्य करतो, त्यास परखडपणे उत्तर देणारा केवळ कणखर नेता अजित पवार हेच आहेत.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. ज्यांना उभे राहायचे आहे त्यांनी आपला कार्यकर्ता कोण आहे, हे बघून तयारीला लागा. निवडणूका कधीही जाहीर होऊ शकतात, असेही भरणे म्हणाले.

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्ली (टेंभुर्णी) येथील फार्म हाऊस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, शिवाजी कांबळे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande