ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची देगलूर विश्रामगृहात विशेष बैठक
नांदेड, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि न.पा.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील देगलूर विश्रामगृहात आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आली. देगलूर नगरपालिकेच्या न
अ


नांदेड, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि न.पा.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील देगलूर विश्रामगृहात आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आली.

देगलूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या 2025 संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आढावा आयोजीत बैठक घेण्यात आली देगलूर शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक व युवासैनिक विश्रामगृह देगलूर येथे उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगरपालिका निवडणुका शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने लढवण्याचा निर्धार या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये देगलूर शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याची माहिती महेश पाटील यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande