सोलापूर - मोर्चेबांधणीसाठी सांगोल्यातील पदाधिकारी श्रीकांत शिंदेंच्या भेटीला
सोलापूर, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सांगोला नगरपरिषदेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना (शिंदे गट) ताकदीने लढवणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.सोलापूर
सोलापूर - मोर्चेबांधणीसाठी सांगोल्यातील पदाधिकारी श्रीकांत शिंदेंच्या भेटीला


सोलापूर, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सांगोला नगरपरिषदेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना (शिंदे गट) ताकदीने लढवणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत सांगोला तालुक्याच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला.

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, ‘सांगोला नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आम्ही ताकदीने लढवू. कार्यकर्त्यांना न्याय देऊन सांगोला तालुक्याला विजयश्री मिळवून देऊ.’

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande