लातूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर तालुक्यातील मळवटी येथील ट्वेंटीवन शुगरच्या ५ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अवीर अमित देशमुख यांच्या हस्ते विधिवत बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख आणि ट्वेंटीवन ॲग्री लिमिटेडच्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार रोजी लातूर तालुक्यातील मळवटी येथील ट्वेंटीवन शुगरच्या ५ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अवीर अमित देशमुख यांच्या हस्ते विधिवत बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला.
यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कारखाना स्थळी वृक्षारोपण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis