राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पूर्णा येथे बैठक संपन्न
परभणी, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पूर्णा येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नगरपालिक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पूर्णा येथे बैठक संपन्न


परभणी, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पूर्णा येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

नगरपालिकेसह ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात अनेक प्रभागांमधील उत्सुक उमेदवारांनी भेट देत पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी आपली भूमिका मांडली. बैठकीदरम्यान उमेदवार व पदाधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीचे अध्यक्षपद चक्रवती वाघमारे यांनी भूषविले.

कार्यक्रमाला महिला तालुकाध्यक्ष सौ. रचना भालेराव, शहराध्यक्ष आशा हटकर, शहर उपाध्यक्ष राजश्री अहिरे, युवा शहराध्यक्ष साहिल मौलाना, शहर संघटक गोविंद गजभारे, मास्टर सुनील भालेराव, आनंदीपक अंबादास डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत साहेबराव एगडे, सतीश तुरे, रानबा जोगदंड, पप्पू नरवाडे यांसारख्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. या निमित्ताने पक्षाची ताकद वाढल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. बैठकीदरम्यान स्थानिक प्रश्न, आगामी निवडणुकीची रणनीती आणि सामाजिक न्याय विभागाचे पुढील नियोजन यावरही सविस्तर चर्चा झाली. कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande