लातूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नवीन शेतकरी भवन बांधकाम शुभारंभ तसेच अहमदपूर तालुक्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून २ कोटी ९० लक्ष रुपयांच्या शेतकरी भवनाचा आणि ६ कोटी २५ लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ केला.
अहमदपूर तालुक्यासाठी आणि विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ करीत आहोत. हे भवन केवळ एक वास्तू नसून, हे आपल्या शेतकऱ्यांच्या घामाने आणि कष्टाने उभारलेले विश्वासाचे प्रतीक ठरणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी “ग्रामगीता”च्या माध्यमातून ग्रामविकास आणि श्रमसंस्कृतीचा जो संदेश दिला, त्याच प्रेरणेने हे शेतकरी भवन उभे राहणार आहे.
असे मंत्री पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांना बैठका, मार्गदर्शन शिबिरे, कृषी सल्लागार कार्यक्रम, तसेच बाजार समितीच्या विविध योजनांची माहिती एका ठिकाणी मिळणार आहे. अहमदपूर तालुक्यातील शेतकरी नेहमीच प्रगतीशील राहिले आहेत. सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, आधुनिक पद्धतींचे अवलंबन या सर्व क्षेत्रात अहमदपूरच्या शेतकऱ्यांनी नाव कमावले आहे. विविध विकासकामांचा शुभारंभही होत आहे.हे कामे म्हणजे केवळ विटा आणि सिमेंट नाहीत तर ही कामे आपल्या विकासाच्या वाटचालीतील नवी पायरी आहेत. असे त्यांनी सांगितले
सरकारच्या आणि बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा, बाजारपेठेपर्यंत त्यांचा थेट संपर्क व्हावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आगामी काळात बाजार समितीचे संपूर्ण डिजिटायझेशन, पारदर्शक व्यापार प्रणाली, तसेच शेतकऱ्यांसाठी साठवण व कोल्ड स्टोरेज सुविधा उभारण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहेत. आपण घेतलेली ही पायाभरणी फक्त इमारतीची नाही तर ती विश्वास, श्रम आणि स्वावलंबनाची पायाभरणी आहे. आपण सर्वांच्या सहकार्याने अहमदपूर तालुका कृषी विकासाच्या क्षेत्रात नक्कीच नवे यश संपादन करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. याचा उल्लेख मंत्री पाटील यांनी केला
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण सर्वांनी “श्रम हीच पूजा, विकास हीच सेवा” या ध्येयाने कार्य करूया, हीच अपेक्षा व्यक्त करतो.
प्रसंगी बाळासाहेब जाधव साहेब, प्रमुख पाहुणे साहेबराव जाधव तसेच मंचकराव पाटील, संजय पवार, सहाय्यक निबंधक आदिनाथ पालवे , सांबतात्या महाजन, दिलीपरावजी देशमुख, हेमंतराव पाटील, बालाजी रेड्डी, शिवानंद तात्या हिंगणे, शिवाजीराव देशमुख, भारत भाऊ चात्रे, अशोक काका केंद्रे, मुजीबजी पटेल सर, बाबासाहेब कांबळे, अभय मिरकले, बादुभाऊ कासनाळे, किशोर बापू मुंडे, टी एन कांबळे, तसेच सर्व संचालक मंडळ, चेअरमन, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis