नांदेड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील
भारतीय जनता पार्टी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रतिस्पर्धी राजकीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप चिखलीकर यांच्या बालेकिल्ल्यात अशोक चव्हाण यानिमित्ताने जाणार आहेत. त्यामुळे राजकीय समीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे
शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजता, विश्वनाथ संकुल बस स्टॅन्ड समोर मेन रोड लोहा लोहा येथे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी .खा.श्री.अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र तथा खासदार, राज्यसभा, नवी दिल्ली
अतुल सावे पालकमंत्री, तुषार राठोड
आमदार मुखेड मतदार संघ
अजित गोपछडे
खासदार राज्यसभा, राजेश पवार आमदार नायगांव मतदार संघ
संजयकौडगे मराठवाडा संघटनमंत्री, भाजपा
श्रीजयाताई चव्हाण
आमदार भोकर मतदार संघ अमरभाऊ राजुरकर
डॉ. श्री. संतुकरावजी हंबर्डे
महानगराध्यक्ष भाजपा, नांदेड तथा मा. गटनेते विधानपरिषद
जिल्हाध्यक्ष भाजपा, नांदेड दक्षिण
एकनाथराव पवार भाजपा नेते उपस्थित राहणार आहेत असे
गजानन सुर्यवंशी
तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, लोहा यांनी कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis