भाजप आ सुरेश धस यांच्या विजयाची पूर्ती
बीड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। आष्टी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ गड चिंचोली येथे आज नवस पूर्ती उत्सव संपन्न झाला. आठवी विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यावेळी उपस्थित होते. आष्टी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ गड, चिंचोली येथे
आमदार सुरेश धस


बीड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

आष्टी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ गड चिंचोली येथे आज नवस पूर्ती उत्सव

संपन्न झाला. आठवी विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यावेळी उपस्थित होते.

आष्टी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ गड, चिंचोली येथे श्री. सचिन दातीर यांनी या विधानसभेत आमदार सुरेश धस भाजप यांना विजयी होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस केला होता.

या नवसपूर्ती कार्यक्रमास भाजप आमदार सुरेश धस हे उपस्थित राहिले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी कृतज्ञतेची व भक्तिभावाची भावना व्यक्त केली.

याप्रसंगी , ज्येष्ठ नेते व माजी आमदार साहेबराव दरेकर (नाना) , संदीप खकाळ, राजेंद्र दहातोंडे, अंकुश चव्हाण, अशोक लगड, रवींद्र ढोबळे, रामेश्वर चव्हाण, सरपंच हनुमंत अडागळे, संपत कोळेकर आणि उद्धव कर्डीले मान्यवर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande