नांदेड : भाजप खा. अजित गोपछडे यांनी पालावरची दिवाळी केली साजरी
नांदेड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।एक दिवा वंचितांसाठी अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पालावरची दिवाळी साजरी केली आहे.भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांतर्गत पालावरची दिवाळी खासद
खासदार नांदेड


नांदेड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।एक दिवा वंचितांसाठी अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पालावरची दिवाळी साजरी केली आहे.भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांतर्गत पालावरची दिवाळी खासदार गोपछडे यांनी साजरी केली आहे.याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक दिवा वंचितांसाठी या अंतर्गत , पाडा आणि पालावर निवास करणाऱ्या राज्यातील भटक्या व विमुक्त बांधवांसोबत त्यांच्या वस्तीमध्ये ही दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला .त्या अनुषंगाने बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील वडार समाजातील महिला भगिनी व बांधवांसोबत त्यांना दिवाळी फराळ ,महिलांना साडी वाटप व फटाके देऊन चिमुकल्यांसोबत पालावरची दिवाळी साजरी केली. यावेळी वडार समाजातील महिला भगिनी , पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande