छ. संभाजीनगर : गुंठेवारी संदर्भात महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत
छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सातारा-देवळाई गुंठेवारीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे भारतीय जनतापक्षाने तसेच छत्रपती संभाजी नगर येथील खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून महा
गुंठेवारी


छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सातारा-देवळाई गुंठेवारीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे भारतीय जनतापक्षाने तसेच छत्रपती संभाजी नगर येथील खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी स्वागत केले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. महानगरपालिकेने सातारा देवळाई गुंठेवारी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला न्याय मिळाला असून, सातारा-देवळाई परिसरातील रहिवाशांच्या आशा-आकांक्षांना बळकटी मिळाली आहे.अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर कराड यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा-देवळाई गुंठेवारी कृती समितीच्या वतीने संपर्क कार्यालय येथे येऊन आभार व्यक्त करण्यात आले तसेच सत्कारही करण्यात आला.

शासन व प्रशासनाने घेतलेला हा जनहिताचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.

या निर्णयामुळे परिसराच्या विकासाचा मार्ग सुखकर होऊन नागरिकांना स्थैर्य आणि विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande