अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)
बडनेरा शहरातील सावता युवक मंडळद्वारा संचालित श्रीराम विजय महोत्सवांतर्गत सावता मैदान (जुने शहर) येथे बुधवारी (ता.२२) सायंकाळी आठ वाजता आमदार रवी राणा यांच्या हस्ते नरकासुर दहन मोठ्या उत्सहात करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निखिल लढके तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रशेखर भोंदू, आमदार रवी राणा, प्रशांत लांडे, जयंत डेहनकर, रवींद्र तहेकर यासह नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे सामूहिक पद्धतीने पुष्पहार घालून करण्यात आली.
प्रास्ताविक रवींद्र तहेकर यांनी केले. जयंत डेहनकर यांनी विचार व्यक्त करताना शहराच्या इतिहासाची ओळख करून दिली. पराजयावर विजयाचा दिवस असलेला हा उत्सव सतत ८८ वर्षापासून सुरू आहे.
त्याला मिळणारा प्रतिसाद लोकांच्या गर्दीतून जाणवते. ही परंपरा सतत सुरू राहावी, हा स्वर्गीय विजय नागपुरे यांचा ध्यास होता. त्यांची उणीव जाणवत आहे. असे सांगितले. चंद्रशेखर भोंदू यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. आमदार रवी राणा यांनी बडनेरा शहर माझी अयोध्या आहे. या शहराने माझ्यावर खूप प्रेम केलेआणि मला चौथ्यांना निवडून दिले, असे सांगितले.त्यानंतर लगेच प्रतिकात्मक नरकासुर यांचे दहन आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी