भाजपा आ. प्रवीण तायडे यांच्या प्रयत्नांना यश
अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)
चांदूरबाजार आणि अचलपुर नगरपरिषदांच्या विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण निधी योजनेअंतर्गत तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हां निधी मंजूर होण्यासाठी लोकप्रिय आमदार प्रवीण तायडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फळ मिळाले असून, मतदारसंघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या निधीच्या मंजुरीमुळे दोन्ही नगरप रिषद हद्दीतील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे. अचलपूर नगरपरिषदेच्या क्षेत्रात खालील कामांचा समावेश करण्यात आला आहे. वाघामाता चौकाजवळ छत्रपती संभाजी महाराज सृष्टी नगीचा विकसित करणे, भगतसिंग चौकातील हनुमान व्यायामशाळा येथे नगरपरि षदेचे नभागृह बांधकाम, जलतरण तलावाजवळ क्रिकेट टर्फ ग्राउंड तयार करणे, कॅम्प विभागातील सर्किट हाऊस येथे जिजाऊ सृष्टी बगीचा विकसित करणे, अचलपूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे विस्तारीकरण, परतवाडा येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात सभागृह बांधकाम, पंचायत समिती नगर परिषद प्राथमिक शाळेजवळ आच्छादित क्रीडांगण उभारणी, सुल्तानपुरा येथील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ सामाजिक सभागृह बांधकाम, अब्बासपुरा येथील कालंका माता (गर्गेची ची देवी) मंदिराजवळ सामाजिक सभागृह उभारणी, तर चांदूरबाजार नगरपरिषद क्षेत्रात पुढील दोन प्रमुख कामांचा समावेश आहे. मोर्शी रोडवरील हिदू स्मशानभूमीचा विकास, माळीपुरा येथील श्री राम मंदिराजवळ सामाजिक सभागृह बांधकाम नागरिकांच्या गरजेनुसार या सर्व कामांची मागणी होत होती. त्यावर आमदार प्रवीण तायडे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या मंजुरीमुळे अचलपूर आणि चांदूरबाजार शहरांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी