छ. संभाजी नगरात पशु प्रदर्शन; अनेकांच्या भेटी
छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील राजाबाजार ते नवाबपुरा परिसरात दीपावली सणानिमित्त भव्य पशु प्रदर्शन (सगर) आयोजित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती संभाजीनगर शहरात पशुपालकांनी आपले पशु या ठिकाणी आणले
पशुप्रदर्शन


छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील राजाबाजार ते नवाबपुरा परिसरात दीपावली सणानिमित्त भव्य पशु प्रदर्शन (सगर) आयोजित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती संभाजीनगर शहरात पशुपालकांनी आपले पशु या ठिकाणी आणले. विशेष म्हणजे दीपावलीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशुप्रदर्शन आयोजित करण्याची परंपरा आहे.

या ठिकाणी भेट देण्याची संधी अनेकांना मिळाली . भारतीय जनता पक्षाचे छत्रपती संभाजीनगर येथील खासदार डॉक्टर भागवत कराड यांनीही या पशुप्रदर्शन सोहळ्याला भेट दिली. या सगरमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनाद्वारे ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि पशुपालनाचा वारसा जिवंत ठेवण्याचे सुंदर दर्शन घडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande