उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात शनिवारी सभा
नांदेड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी उमरी येथे सकाळी 10.00 वाजता व देगलूर येथे दुपारी 1.00 वाजता पक्षप्रवेश सोहळा व सभा आहे. नां
अ


नांदेड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री

अजितदादा पवार यांची दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी उमरी येथे सकाळी 10.00 वाजता व देगलूर येथे दुपारी 1.00 वाजता पक्षप्रवेश सोहळा व सभा आहे.

नांदेड जिल्ह्यातील उमरी आणि देगलूर येथील विविध पक्षातील नेते पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत

यानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या साई-सुभाष वसंत नगर नांदेड येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन संदर्भात बैठक पार पडली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने देगलूर आणि उमरी येथे होत असलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे.

यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, व्यंकटराव पाटील गोरेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, शेषेराव चव्हाण, नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैशालीताई स्वप्निल चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, शिरीष देशमुख गोरठेकर, कैलास देशमुख गोरठेकर, लक्ष्मीकांत पदमवार, शिवाजीराव कणकटे, कन्हैया कदम, मोहसीन खान पठाण, स्वप्निल इंगळे, बालाजी शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande