रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : भाजपसह महायुतीकडून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दिवा्ळी शुभेच्छा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याद्वारे नागरिकांशी संवाद साधत पक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी नागरिकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान प्रभाग क्रमांक १चे शक्ती केंद्रप्रमुख नितीन जाधव बुथ प्रमुख राकेश सुवारे, मंदार खंडकर, संदीप मांडवकर, निलेश मराठे यांच्यासह प्रभागातील विविध बूथप्रमुखांशी चर्चा करून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा तसेच निवडणुकीसंदर्भातील तयारीबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या मतांची देवाणघेवाणही करण्यात आली.यावेळी प्रणाली रायकर, सोनाली केसरकर, भक्ती दळी, प्रज्ञा टाकळे, कामना बेग, सारिका शर्मा, संतोष सावंत, प्रसाद बाष्टे, नितीन गांगण, संदीप सुर्वे, नीलेश आखाडे आणि संदीप रसाळ रायकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.या उपक्रमास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील संघटनात्मक काम अधिक जोमाने सुरू असल्याचे शहराध्यक्षांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी