रत्नागिरी : विठ्ठलवाडी गणेश मंडळाची आदिवासी पाड्यावर आनंदाची दिवाळी
रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : खेर्डी (ता. चिपळूण) येथील विठ्ठलवाडी गणेश मंडळाने आदिवासी पाड्यावर आनंदाची दिवाळी साजरी केली. मंडळाचे मार्गदर्शक दशरथशेठ दाभोळकर यांच्या प्रेरणेने आणि अध्यक्ष शशांक भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली, विठ्ठलवाडी गणेश मि
विठ्ठलवाडी गणेश मंडळाची आदिवासी पाड्यावर आनंदाची दिवाळी


रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : खेर्डी (ता. चिपळूण) येथील विठ्ठलवाडी गणेश मंडळाने आदिवासी पाड्यावर आनंदाची दिवाळी साजरी केली. मंडळाचे मार्गदर्शक दशरथशेठ दाभोळकर यांच्या प्रेरणेने आणि अध्यक्ष शशांक भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली, विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाने आदिवासी पाड्यावर जाऊन दिवाळीचा फराळ, कपडे, भांडी आणि इतर गृहोपयोगी वस्तूंचे वाटप केले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कुंभार्ली येथील कातकरी पाड्यावर सुमारे 20 घरांना विविध मदतीचे वाटप करण्यात आले.

विठ्ठलवाडी गणेश मंडळ ही खेर्डीतील एक सेवाभावी संस्था असून, दरवर्षी लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवते. यंदाच्या वर्षीही मंडळाने आपल्या सामाजिक बांधिलकीतून गरजू लोकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.या उपक्रमासाठी मंडळाचे सल्लागार संभाजी दाभोळकर, माजी उपाध्यक्ष अजित वाडकर, खजिनदार शरद पवार, दत्तात्रय (बाळू) कदम, संदीप सुर्वे, राकेश दाभोळकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande