लातूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूरमधील तरुण उद्योजक बांधकाम क्षेत्रात पुढाकार घेत नवे रोजगार आणि विकासाची संधी निर्माण करत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. लातूरच्या विकासासाठी उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात योगदान असल्याचे मत डाॅ.अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.
लातूर शहरातील औसा रोड येथे रेड्डी रिअल इस्टेट व सुंदरम बिल्डर्सच्या नवीन ऑफिसचा शुभारंभ डाॅ.अर्चना पाटील चाकूरकर यांच्या हस्ते पार पडला. त्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या.
यावेळी माधव कुटवाडे व श्रीनिवास लांडगे यांना त्यांच्या या व्याव्यायिक वाटचाली भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नामदेव लांडगे, रुपाली लांडगे, राहुल लांडगे, वसंत बिराजदार, रुद्रेश्वर स्वामी, सुदर्शन जाधव, मोहन कुंभार, विजय धन्ना, दिनेश बोरा, संदीप जाधव, विश्वजीत पाटील, सुदर्शन सुडे, शुभम भिसे, नवनाथ कुटवाडे आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis