पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार
पुणे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार


पुणे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) आणि भाजपा या दोन पक्षात तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान धंगेकरांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर केला असून याबरोबर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही, असे धंगेकर म्हणाले आहेत.शिवसेना (शिंदे) पक्षात असलेल्या धंगेकरांनी महायुतीतील बड्या नेत्यावर आरोप केल्याने त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यादरम्यान धंगेकरांनी पोस्ट करत एकनाथ शिंदे अशी कारवाई करणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. “शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे,” असे धंगेकर म्हणाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande