पुणे - शहरभर आता डोअर टू गेट कचरा संकलन
पुणे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। संपूर्ण शहरात डोअर टू गेट कचरा संकलन राबवता येईल का, याचा महापालिका गंभीरपणे विचार करत आहे. विमाननगर व भवानी पेठ येथे गेला महिनाभर प्रायोगिक स्वरूपात राबविलेल्या पद्धतीने स्वच्छतेत चांगला फरक पडला आहे. त्यामुळे हे मॉडेल इ
पुणे - शहरभर आता डोअर टू गेट कचरा संकलन


पुणे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। संपूर्ण शहरात डोअर टू गेट कचरा संकलन राबवता येईल का, याचा महापालिका गंभीरपणे विचार करत आहे. विमाननगर व भवानी पेठ येथे गेला महिनाभर प्रायोगिक स्वरूपात राबविलेल्या पद्धतीने स्वच्छतेत चांगला फरक पडला आहे. त्यामुळे हे मॉडेल इतरत्र राबविण्याची तयारी सुरू असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.या पद्धतीत घरांमधील कचरा सोसायटीच्या प्रवेशद्वारापर्यंत निश्चित वेळेत उचलला जातो. त्याच वेळी संकलित कचरा थांबून राहू नये म्हणून समानवेळी वाहने सज्ज ठेवली जातात. पूर्वी रस्त्यांच्या कडेला, चौकांत व पदपथांवर पडणारे कचऱ्याचे ढीग पूर्णपणे बंद झाले. सार्वजनिक ठिकाणी कचरा न राहिल्याने नागरिकांकडून गुपचूप कचरा टाकण्याचे प्रकारही थांबल्याचे समोर आले आहे. विमाननगर-भवानी पेठ परिसरात हा प्रयोग राबविला आहे.

अंमलबजावणी काळात कचरा वेचक, वाहनचालकांच्या कामावर जीपीएसद्वारे थेट देखरेख ठेवली. कोणतेही वाहन उशीर करत असल्यास त्वरित सूचित करून संकलनातील खंड तात्काळ भरून काढला. या रिअल टाईम नियंत्रणामुळे फिडर पॉईंटस् जवळ निर्माण होणारे कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी झाली.ज्या भागांत ही चाचणी राबवली, त्या ठिकाणी रस्त्यांच्या दृश्यस्वच्छतेत आश्चर्यकारक बदल दिसला. आता दुसरा टप्पा म्हणून वाघोलीसह शहराच्या इतर भागांतही ही पद्धत लागू करण्यासाठी आराखडा तयार होत असल्याचे कदम यांनी सांगितले. विस्तारासाठी मनुष्यबळ, वाहने , मार्गरचना व देखरेख व्यवस्था या चार मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी विभागीय स्तरावर पथक नियुक्त केली जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande