बीड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते श्रीगुरू बंकटस्वामी देवस्थान, नेकनूर येथे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत एकूण ३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या उपक्रमांतर्गत प्रसादालय बांधकाम, भक्तनिवास, संरक्षण भिंत आणि स्वच्छता गृह या महत्त्वाच्या सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.
श्रद्धा, सेवा आणि सुविधा यांचा संगम साधत बंकटस्वामी देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या विकासकामांमुळे श्रीगुरू बंकटस्वामी तीर्थक्षेत्र अधिक सुसज्ज, स्वच्छ आणि भक्तांसाठी सोयीस्कर बनेल, असा विश्वास आहे.
याप्रसंगी श्री ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे (मठाधिपती, श्रीगुरू बंकटस्वामी संस्थान), आदरणीय नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, मा. श्री भारत (बप्पा) काळे (मा. जिल्हा परिषद सदस्य व विश्वस्त, श्री बंकटस्वामी संस्थान, नेकनूर), मा. श्री पांडुरंग (अण्णा) होमकर (मा. पंचायत समिती सदस्य) विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis