लातूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लातूर शहरातील एस.ओ.एस. बालग्रामला कुटुंबीयांसह भेट दिली.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व ट्वेंटीवन ॲग्री लिमिटेडच्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख आणि चिरंजीव अवीर अमित देशमुख यांनी गरुड चौक परिसरातील एस.ओ.एस. बालग्रामला भेट देऊन, पालकत्व हरवलेल्या सर्व मुला-मुलींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत सणाचा आनंद साजरा केला.
यावेळी एस.ओ.एस. बालग्रामचे अधीक्षक अमित नागरे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, कैलास कांबळे, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, ॲड. फारुक शेख आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि बालग्राममधील मुले-मुली उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis