सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। मंगळवेढा शहरात लोकसहभागातून उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण 26 ऑक्टोबरला होणार असून त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मंगळवेढ्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले त्या निमंत्रणावर त्यांनी ग्रीन सिग्नल दिला.शहरांमध्ये अनेक संतांचे वास्तव लाभल्याने संताची भूमी म्हणून मंगळवेढा शहराची ओळख राज्यभर निर्माण झाली.अशा परिस्थितीत शहरात 360 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज विजापूर स्वारीवर जात असताना शहरातील भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांनी मुक्काम केला अशा पदस्पर्श झालेल्या झालेल्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा व्हावा ही येथील शिवभक्ताची मागणी होती त्यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या परंतु त्याची अद्याप यश आले नाही. आ. अभिजीत पाटील यांनी स्वखर्चातून पुतळा उभा करून देण्याचे आश्वासन दिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड