कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणे आवश्यक - बाबासाहेब पाटील
लातूर, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर, उपबाजार समिती किनगाव, कै. मधुकरराव मुंढे उपबाजार समिती किनगाव तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला. या बाजार समिती व उपबाजार समित्या तसेच इतर विका
कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणे


लातूर, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)।

कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर, उपबाजार समिती किनगाव, कै. मधुकरराव मुंढे उपबाजार समिती किनगाव तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला.

या बाजार समिती व उपबाजार समित्या तसेच इतर विकासकामांमुळे अहमदपूर आणि परिसरातील शेतकरी बांधवांना चांगल्या बाजारपेठेच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, या विकासकामांचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे आणि कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे. हा अहमदपूरच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

यावेळी दिलीपराव देशमुख, सभापती मंचकराव पाटील, उपसभापती संजय पवार, तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंडे, प्रदेश सरचिटणी शिवानंद तात्या हिंगणे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा उपनिबंधक आदिनाथ पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक आबा गुहे, , बाळू पवार तसेच सर्व शेतकरी बांधव, यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande