पुणे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे शहरातील मॉडेल कॉलनीमधील जैन समाजाच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर हे दररोज नवनवीन माहिती समोर आणून मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करीत आहे.
त्या प्रश्नावर मुरलीधर मोहोळ म्हणाले,मी त्या दिवशीच माझ स्पष्टीकरण दिल आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुक झाली आहे.त्यानंतर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली जात आहे.हे लक्षात घेता,राजकीय नैराश्यामधून टीका केली जात आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार,अशा शब्दात रविंद्र धंगेकर यांना टोला लगावला. गोखले बांधकाम व्यावसायिक बाबतचा तुमचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला.त्या प्रश्नावर मुरलीधर मोहोळ म्हणाले,त्या व्हिडिओबाबत यापुर्वी देखील भूमिका मांडली आहे.विशाल गोखले हा माझा मित्र होता,आहे आणि राहणार आहे.यामध्ये कोणताही बदल नाही.पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करीत असल्याचे दाखविण्यात आले.तो व्हिडिओ कालचा किंवा परवाचा नाही.तसेच काल एक जण कोणाची तरी जाहिरात करीत असल्याच दिसल,मग ते लगेच पार्टनर झाले का असा सवाल उपस्थित करित मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले,त्यामध्ये आपण जाऊ नये, पण या पुणे शहराची एक राजकीय संस्कृती असून कुठे तरी एक माणुस त्याची वाट लावत आहे.त्यामुळे सर्वांनी सावध राहण्याचा सल्ला देत रविंद्र धंगेकर यांना टोला लगावला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु