नांदेड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यातील रावणगाव येथे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या वतीने रावणगाव ता. भोकर, नांदेड येथे दिपावलीनिमित्त स्नेहभोजन व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी सभापती नागनाथराव घिसेवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल हंबर्डे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कन्हैया कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, श्रीधर नागपूरकर, माजी सभापती बाबुराव हेंद्रे, नागोराव पाटील रोषनगावकर, सुरेश बिल्लेवाड, अभिषेक लुटे, श्रीकांत किन्हाळकर यांच्यासह अनेकांच्या उपस्थिती होती.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis