लातूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे भाच्चे,लातूर येथील जेएसपीएम शिक्षण संस्थेचे समन्वयक संचालक तथा भारतीय जनता पाटचे माजी ग्रामीण जिल्हा सरचटिणीस, जननायक संघटनेचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार यांचे 22 ऑक्टोबर 2025 रोजी अल्पशा आजाराने हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील ए. जी. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लातूर येथील डॉक्टर हलकंचे यांच्या साई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान 22 ऑक्टोबर रोजी त्यांचे उपचारादरम्यान अकाली निधन झाले.
त्यांनी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांच्या राजकीय वाटचालीत व जेएसपीएम संस्थेच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम केलेले आहे. त्यांच्या अकाली जाण्यामुळे कव्हेकर व पवार परिवारांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यांच्या पार्थिवावर चांडेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संजय शेटे, आदितीताई पाटील कव्हेकर,रंजितसिंह पाटील कव्हेकर,संभाजीराव पाटील रावणगावकर, नगरसेविका रागिनीताई यादव, प्राध्यापक सतीश यादव, राजकुमार पाटील सास्तूरकर, अनिरूध्द पाटील, दौलत पाटील, विनोद जाधव,बाळासाहेब मोहिते, अमरजीत जाधव, बब्रूवान पवार, विश्वंभर पाटील काळेगावकर, बापुसाहेब गोरे, प्राचार्य आर. एस. अवस्थी ,लक्ष्मीकांत गौड, दिलीप पाटील, अशोक पाटील,जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, बाबासाहेब देशमुख, माधवराव गायकवाड,उध्दवराव जाधव, लातूर जिल्हा मध्यवत बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोदआबा जाधव ,माजी नगरसेवक चंद्रकांत चिकटे ,मोहन माने, सुंदर पाटील कव्हेकर, नगरसेवक देवा साळुंके, शिक्षक नेते केशव गंभीरे, संजय गीर, यांच्यासह विविध क्षेत्रातील हजारो नागरिक उपस्थित होते.
निळकंठराव पवार यांच्यासारखे कुशल संघटक धाडसी नेतृत्व गमावले.
जननायक संघटनेचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा संघटनेचे कुशल संघटक निळकंठराव पवार यांचे हैदराबाद येथील रूग्णालयात उपचारादरम्यान अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जननायक संघटनेचे व कव्हेकर परिवाराचे नुकसान कधीही भरून न निघणारे झालेले आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशा भावनाही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बोलताना व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis