पुणे, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयापासून ते खात्यांतर्गत सुरू असलेले दावे निकाली काढण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दि. २७ ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर या कालावधीत विधी सप्ताह आयोजित केला आहे, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी ही माहिती दिली.नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे व्यवहार रद्द झाल्याने परतावा, मुद्रांक शुल्क आकारणी यांच्यासह विविध प्रकाराचे कामे केली जातात. त्यामुळे दावे दाखल करण्याचे प्रमाणही मोठे आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेले दावे निकाली काढण्यासाठी विभाग पातळीवर वर्षभर काम चालते;परंतु प्रलंबित आणि नव्याने दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विभागाने विधी सप्ताहाचे आयोजन करून प्रलंबित दावे निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात विविध न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबरोबर न्यायालयांमध्ये प्रतिज्ञापत्रे दाखल करण्याच्या कामास वेग दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु