अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)
ऐन दिवाळीत बच्चू कडू व राणा दाम्पत्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले.
नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याएवढे नाटकी दाम्पत्य या देशात कुठेही दिसणार नाही. बायको भाजपत आणि नवरा स्वाभिमान संघटनेत. राणाची बायकोच त्याच्या संघटनेत राहू शकत नसेल, तर मी काय बोलणार, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. तसेच राणा दाम्पत्य अत्यंत लाचार असल्याचे देखील कडू म्हणाले. त्यांच्या या टीकेमुळे अमरावतीत भर दिवाळीतच आरोप अन् टीकेची लड फुटली आहे.
माजी खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. सध्या बरेच लोक नाटक करत आहेत. बाहेर फिरून आमदारांना मारून टाकण्यास सांगत आहेत. अचलपूरच्या माजी आमदाराकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. पण त्यांनी कधीच आपल्या खिशात हात टाकला नाही. त्यांच्याकडे फक्त इनकमिंग आहे, आऊटगोइंग नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी राज व उद्धव ठाकरे व्यांच्या संभाव्य राजकीय युतीवरही निशाणा साधला होता. मजबुरीचे दुसरे नाव ठाकरे बनल्याची टीका त्यांनी केली होती.
बायको भाजपमध्ये व नवरा युवा स्वाभिमानमध्ये का?
बच्चू कडू यांनी बुधवारी त्यांच्या या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, तुम्हीच गटार गंगेत उभे आहेत. यानंतरही तुम्ही राज व उद्धव ठाकरेंवरटीका करत आहात. तत्पूर्वी, तुम्ही बायको भाजपमध्ये व नवरा युवा स्वाभिमानमध्ये का? याचे उत्तर द्या. याला कसला स्वाभिमान म्हणायचे? ना मान ना स्वाभिमान. राणा एढे नौटंकी जोडपे देशात कुठेही दिसून येणार नाही. बायको भाजपत व नवरा स्वाभिमानत संघटनेत असे कुठे असते का? याची बायकोही याच्या संघटनेत राहू शकत नाही, याच्यावर एवढी नाचक्की येत असेल तर आम्ही काय बोलावे दिवाळीच्या दिवशीही राणांना बच्चू कडूंची आठवण येते. त्यांना देवधर्म आठवत नाहीत. माझी आठवण येते. हा किती जिव्हाळा आहे. किती प्रेम आहे. मी विधान परिषदेसाठी आंदोलन करत असल्याचा त्यांचा दावा आहे. पण हे माझे नव्हे तर तुमचे धंदे आहेत. सगळ्या पक्षांचे पाठिंबे घेऊन निवडणुका लढता. कधी मशिदीत तर कधी मंदिरात जाता. कधी नमाज पढायचा, तर कधी प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन राजकारण करता. पण मी मरेपर्यंत कणाच्याही ओंजळीने पाणी पिणार नाही. कुण्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्हीआमदार होणार नाही आम्ही आमच्या ताकदीवर लढू. देवंद फडणवीस यांच्याकडून कार्यक्रम मिळाल्यानंतर तुम्ही दोघे बोलू लागलात, असेही बच्चू कडू यावेळी राणा दाम्पत्यावर निशाणा साधताना म्हणाले.आ. रवि राणा यांचा पलटवार .... तर बच्चू कडू च्या टीकेला आ राणा यांनी लगेचच उत्तर देत बच्चू कडू हा चिल्लर माणूस आहे.शिवसेनेतील बंडावेळी केवळ पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. बच्चू कडूंनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. विधानसभेला उमेदवार उभे करून पैसे उकळणे हेच त्यांचे काम व धंदा आहे. हा एक नंबर चिल्लर माणूस असून, त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये, असे त्यांनी म्हटले आहे. रवी राणा यांच्या या टीकेमुळे अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.बच्चू कडू यांनी बुधवारी सकाळी राणा दाम्पत्यावर टीका केली होती. राणा दाम्पत्यासारखे नाटकी दाम्पत्य अवघ्या देशात सापडणार नाही, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, बच्चू कडू यांची नौटंकी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांची आदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही. त्यांचे कर्तृत्व तरी काय आहे? त्यांनी १०० जणांना तरी रोजगार दिला का? याऊलट शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या किडनीला इजा झाली. शेतकऱ्याच्या मुलाने बच्चू कडू यांचा निवडणुकीत तब्बल १२ हजार मतांनी पराभव केला. आता ते शेतकऱ्यांचे नाव न घेऊन नौटंकी करत आहेत.एखादे कुत्रे कावरते तेव्हा त्याला उपचारांची गरज असते. बच्चू कडूंवरही उपचार करण्याची गरज आहे. त्यांना योग्य उपचार मिळाले की, ते आपोआप सरेंडर होऊन जाईल. त्यांनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. विधानसभेला उमेदवार उभे करून पैसे उकळणे हे त्यांचे काम आहे. तुम्हाला कुणीही जबाबदारी दिली नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ कराल, आमदारांना कापून टाकण्याची भाषा कराल हे चालणार नाही. बच्चू कडू एक नंबरचा चिल्लर माणूस आहे. चिल्लर माणसाने फार वाजू नये. अन्यथा चिल्लर जास्त वाजली की त्याचे परिणाम भोगावे लागतात, असा इशाराही रवी राणा यांनी यावेळी त्यांना दिला.
बच्चू कडूंना इंजेक्शन देण्याची गरज
रवी राणा यांनी यावेळी बच्चू कडू हे केवळ पैशांसाठीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेल्याचाही दावा केला. ते म्हणाले, बच्चू कडू यांच्यासाठी ना बाप बड़ा ना भैया सबसे बड़ा रुपय्या आहे. बच्चू कडू हे केवळ मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले. चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देऊ नये. त्यांची मतदारसंघात कोणतीही इज्जत नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेकदा आमच्याशी डील करण्याचा प्रयत्न केला. पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला. ते एखाद्या कुत्र्यासारखे महाराष्ट्रभर भुंकत असतात. त्यांना इंजेक्शन देण्याची गरज आहे.
बच्चू कडू डोनाल्ड ट्रम्पच्याही पक्षात जातील
रवी राणा यांनी यावेळी आपल्या पत्नी नवनीत राणा यांनी भाजपत जाण्याचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, मी स्वाभिमान पक्षात आहे. नवनीत राणा भाजपमध्ये आहेत. भाजपत जाण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे त्या भाजपमध्ये गेल्या, त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. बच्चू कडूही पूर्वी । काँग्रेससोबत होते. नंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिले. आता ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. भविष्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा एखादा पक्ष आला तर ते त्यांच्यासोबतही जातील
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी