दिवाळी विशेष रेल्वे गाड्यांचा ‘वंदे भारत’ला बसला फटका
पुणे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गावर विशेष (स्पेशल) रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्याचा फटका नियमित धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांसह ‘वंदे भारत’ला बसत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर ते मुंबई
Railway


पुणे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गावर विशेष (स्पेशल) रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्याचा फटका नियमित धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांसह ‘वंदे भारत’ला बसत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ला एक ते दोन तास उशीर होत आहे. सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) येथून सुटणारी मुंबई ते सोलापूर वंदे भारत नियमित वेळेपेक्षा चार तास उशिराने सुटली. यामुळे सोलापूरला रात्री १० वाजून ४० वाजता पोहोचणारी ही गाडी पहाटे ३ वाजता पोहोचली. यानंतर नियमित देखभाल, दुरुस्तीला वेळ झाला. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी वंदे भारत ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटली. यामुळे पुण्यात यायला दोन तास उशीर झाला. तर सीएसएमटी येथे १२:३५ ऐवजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी पोहोचली. यामुळे प्रवाशांना पुणे स्थानकावर दोन तास ‘वंदे भारत’ची वाट पाहत थांबावे लागले. परिणामी, प्रवाशांना मनस्ताप झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande