छ. संभाजीनगर - बागडे यांची लाड गावातील नागरिकांशी संवाद
छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लाडगाव येथे भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते तसेच नागरिक यांच्याशी त्यांनी संपर्क करून संवाद साधला. लाडगाव ता.छत्रपती संभ
हरिभाऊ बागडे


छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लाडगाव येथे भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते तसेच नागरिक यांच्याशी त्यांनी संपर्क करून संवाद साधला. लाडगाव ता.छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती लॉन्स येथे सरपंच श्री.गजानन बागल व श्री.विजय बागल यांच्या वतीने दिवाळी निमित्त दिवाळी फराळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला राजस्थान राज्यपाल .हरीभाऊ बागडे नाना यांच्या समवेत फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित राहुन ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची जावो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी आमदार अनुराधा ताई चव्हाण, मुख्य अभियंता श्री.अतुल चव्हाण, श्री.राम बाबा शेळके, श्री.रामराव काका शेळके, श्री.सजन नाना मते, श्री.भाऊराव मामा मुळे, श्री.दामोधर नवपुते, श्री.अशोक जिजा पवार, जावेद पटेल, श्री.प्रकाश चांगुलपाय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande