नांदगाव पेठ येथे शिवसेनेतर्फे वयोवृद्धांना ब्लॅंकेट व फराळ वाटप सेवाभावी उपक्रमातून दिवाळीचा आनंद द्विगुणित
अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीच्या शुभ पर्वावर अमरावती तालुका शिवसेनेच्या (उ.बा.ठा) वतीने संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात वयोवृद्धांना ब्लॅंकेट तसेच फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. नितीन हटवार व मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या से
नांदगाव पेठ येथे शिवसेनेतर्फे वयोवृद्धांना ब्लॅंकेट व फराळ वाटप  सेवाभावी उपक्रमातून दिवाळीचा आनंद द्विगुणित


अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीच्या शुभ पर्वावर अमरावती तालुका शिवसेनेच्या (उ.बा.ठा) वतीने संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात वयोवृद्धांना ब्लॅंकेट तसेच फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. नितीन हटवार व मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सेवाभावी उपक्रमातून वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. चंद्रशेखर गिरी व वामनराव गिरी हे होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ या ब्रीदवाक्यानुसार शिवसेना समाजकार्यासाठी सदैव तत्पर आहे,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात नुकतेच एस.आर.पी.एफ. अमरावती येथे निवड झालेल्या विवेक बाबुराव साकोरे व कृणाल बबनराव साकोरे यांचा शाल, श्रीफळ व गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला. तसेच १०१ वर्षीय वयोवृद्ध शामराव पोकळे व मंदिर सेवेत तीन दशकांपासून कार्यरत असलेल्या शामराव महाराज गभणे यांचाही गौरव करण्यात आला. या प्रसंगी विनोद गभणे, मनोज मोरे, विनोद मंडळकर, संतोष मालधुरे, मोरेश्वर मानेकर सर, श्रीकृष्ण साकोरे, विजय कापडे, अविनाश यावले, विनोद सुने, मोरेश्वर इंगोले, पंकज वंजारी, गजानन हटवार, निकु मोहोळ, पवार सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला महिला, पुरुष व वयोवृद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने असा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्याचा निर्धार या वेळी नितीन हटवार यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande