बीड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)दिव्य ज्योती जागृती संस्थान, शाखा लातूर यांच्या वतीने आयोजित श्रीमद् देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ आगामी २५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी योगेश्वरी महाविद्यालय ग्राउंड, अंबाजोगाई येथे संपन्न होणार आहे.
या यज्ञात साध्वी सुश्री अदिती भारतीजी महापुराणाचे निरूपण करणार आहेत. यज्ञाच्या प्रारंभापूर्वी, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता योगेश्वरीदेवी मंदिरापासून मंगल कलश व शोभायात्रा देखील निघणार आहे. आज अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालय ग्राउंडवर, या कार्यक्रमाच्या तयारीसाठी उभारलेल्या सभामंडपाचे भूमिपूजन नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या समवेत केले. सर्व भक्तजनांनी या यज्ञात उपस्थित राहून आध्यात्मिक ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंंदडा यांनी केले आहे
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis