नागपुरातून मुंबईकडे, पुण्याहून बडनेरा येथे परतण्यासाठी विशेष रेल्वे
अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील गर्दीमुळे सध्या तत्काळ आरक्षणही मिळेनासे झाले आहे. लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर गुरुवारी भाऊबिजेच्या रात्रीपासून तर बुधवार, २९ ऑक्टोबरपर्यंत पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड
आज रात्री  बडनेराहून मुंबईसाठी तर पुण्यातून येण्यासाठी विशेष ट्रेन:नागपूर-एलटीटी, नागपूर-हडपसर विशेष गाड्या‎


अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील गर्दीमुळे सध्या तत्काळ आरक्षणही मिळेनासे झाले आहे. लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर गुरुवारी भाऊबिजेच्या रात्रीपासून तर बुधवार, २९ ऑक्टोबरपर्यंत पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. तसेच जनरल कोचमध्येही पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने शुक्रवार, २४ ऑक्टोबरला नागपुरातून मुंबईला जाण्यासाठी तसेच पुण्याहून बडनेरा येथे परतण्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली आहे. या विशेष रेल्वेमुळे बडनेराहून मुंबईला जाण्यास इच्छुक अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना अतिरिक्त पर्याय मिळाला आहे.

गाडी क्र. ०२१४० नागपूर-एलटीटी स्पेशल २४ रोजी दु. १.३० वाजता नागपुरातून निघाल्यानंतर दु. ४.१० वाजताच्या सुमारास बडनेरा येथे पोहोचेल. त्यानंतर २५ ला पहाटे ४.१० वाजताच्या सुमारास एलटीटी स्थानकावर पोहोचेल. त्यामुळे मुंबईत ज्यांना दिवसभर काम आहे. किंवा जे नोकरदार आहेत, त्यांना त्यांच्या कार्यालयात पोहोचणे सुलभ होणार आहे. ही विशेष ट्रेन मार्गात वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण व ठाणे या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे. या विशेष गाडीत ३ एसी थ्री टायर, १० स्लीपर, ५ जनरल द्वितीय श्रेणी, २ जनरल द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅन असे कोच आहे. १० स्लीपर कोच असल्यामुळे प्रवाशांसाठी ही सुविधाजनक गाडी आहे.

त्याचप्रमाणे गाडी क्र. ०१२०२ हडपसर-नागपूरद्वारे बडनेरा येथे परतणे शक्य होणार आहे. हडपसर येथून दु. ३.५० वाजता विशेष ट्रेन निघाल्यानंतर बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ३.३० वाजता पोहोचणार आहे. मात्र, २२ रोजी ती ४ तास उशिरा ७.३० वाजता पोहोचली. मार्गात ही ट्रेन उरळी, दौंड, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या स्टेशनवर थांबे घेणार आहे. या रेल्वेची एक एसी प्रथम श्रेणी, दोन एसी टू टायर, चार एसी थ्री टायर, ६ स्लीपर कोच, ४ जनरल द्वितीय श्रेणी आणि दोन जनरल द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande