अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळीनिमित सायंकाळी सर्वत्र तुकतुकत्या दिव्यांचा प्रकाश पडत असताना अमरावती शहरातील बहाळी परिसरात असणान्या स्मशानभूमीत रात्री दिव्याची राग लुकलुकताना पहायला मिळत आहे. अनेक पिढधांपासून या स्मशानभूमी परिसरातील अनेकांच्या घरातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. परिसरातील युवकांनी स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून सर्व मृत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्मशानभूमी दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकली.
पूर्वी नगरपालिका आणि आता महापालिकेच्या हद्दीत बडाळी परिसर असला तरी या परिसराचा उल्लेख गावठाण असाच आहे. चांदूररेल्वे मार्गावर असणाऱ्या वडाळी गावाच्या भाग सोडला तर इतर भागात मोठ्या स्मशानभूमीची मोठी जागा ही राज्य राखीव पोलीस दलाच्या हद्दीत गेली. उर्वरित भागात आज अंत्यसंस्कार विधी होतात. स्मशानभूमीचा ३० टक्के प्रमाणात झुडूपे तयार झालीत. पावसाळ्यात दिवसासुद्धा स्मशानभूमीत अंत्ययात्रेसाठी जाणे कठीण, परिसरातील काही युवकांनी चार वर्षांपासून स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम हाती घेतली. स्मशानभूमी कचरामुक्त करण्याचे काम हाती घेतले. हळूहळू स्मशानभूमीतील झुडुपे काढली. विविध झाडे लावलीत.
लोकप्रतिनिधींकडे निवेदन सादर करून आमदार निधीतून स्मशानभूमीत शेड व इतर व्यवस्था करून घेतली. आता वेळ मिळेल तेव्हा या युवकांकडून स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण यासह विविध सुधारणांची काम केली जातात.स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारासह ज्या भागात अंत्यविधी होतो. बासह लोकांना ठाण्याकरिता बांधण्यात आलेले जुने आणि नवीन या प्रतीक्षालयात दिवे लावण्यात आलेत. विशेष म्हणजे दिवे लागल्यावर शांत आलेल्या या परिसरात आनंदानी बातावरण निर्माण झाले. तीन-चार वर्षांपासून स्मशानभूमी स्वच्छ सुंदर व्हावी बासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांना परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचा हातभार लागावा अशीच अपेक्षा या तरुणांच्यावतीने व्यक्त केली जाते आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी